-
अभिनेत्री व फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.
-
दोघांनी लग्न न करताच लेक मसाबाचा जन्म झाला होता. नीना गुप्ता यांनी एकल माता म्हणून मसाबाला वाढवलं.
-
मसाबा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर व अभिनेत्री आहे.
-
तिने आईबरोबर मसाबा मसाबा या रिअल लाइफ वेब सीरिजमध्येही काम केलंय.
-
मसाबा सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे.
-
तिने तिचा बॉयफ्रेंड, अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केलंय.
-
मसाबाने काही फोटो शेअर करत तिच्या लग्नाबद्दल माहिती दिली.
-
“आज मी माझ्या प्रेमासह लग्न केले आहे, येणारे आयुष्य प्रेम, शांती, स्थैर्य व सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्यावर हसू घेऊन येईल. आपलं आयुष्य मस्त असणार आहे. आणि तू मला कॅप्शन लिहायला दिलंस यासाठी आभार” असं तिने पोस्ट शेअर करत म्हटलंय.
-
मसाबाच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिचा पती सत्यदीप मिश्रा कोण आहे, याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.
-
मसाबाचा पती सत्यदीप मिश्रा हा बॉलिवूड अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.
-
सत्यदीप ४० वर्षांचा असून त्याचं मसाबाशी दुसरं लग्न आहे.
-
त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री अदिती राव हैदरीशी झालं होतं. दोघांनी २००९ मध्ये लग्न केलं होतं.
-
पण, लग्नाच्या ४ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला होता.
-
अदितीशी घटस्फोट घेतल्यानंतर सत्यदीपने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
-
त्याने नो वन किल्ड जेसिका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
-
सत्यदीपला फिरायची खूप आवड आहे, तो बाईक ट्रीपवर जात असतो.
-
त्याने ‘हिज स्टोरी’, ‘मुखबीर’, ‘काली खुही’, ‘फोबिया’ अशा चित्रपट व सीरिजमध्ये काम केलंय.
-
‘मसाबा मसाबा’च्या सेटवर त्याची मसाबा गुप्ताबरोबर भेट झाली आणि ते दोघे एकमेकांना डेट करू लागले.
-
त्यानंतर आज त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं.
-
सत्यदीप व मसाबाच्या लग्नाला तिचे वडील विवियन रिचर्ड्स यांनीही हजेरी लावली.
-
(सर्व फोटो – मसाबा गुप्ताचे इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख