-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
-
या चित्रपटाने हिंदीसह अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
-
बुधवारी २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली.
-
त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ७० कोटींचा गल्ला जमवला होता.
-
यानुसार पहिल्या दोन दिवसांत या चित्रपटाने १२७.५० कोटींची कमाई केली.
-
‘पठाण’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १०० कोटीहून अधिक कमाई केली होती.
-
यामुळे हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला आहे.
-
चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी याबद्दल ट्वीट करत माहिती दिली.
-
“पठाण चित्रपटाने जगभरात पहिल्या दिवशी १०० कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बहुतांश दाक्षिणात्य चित्रपट आहेत. पण आता या यादीत एक बॉलिवूड चित्रपटही सहभागी झाला आहे”, असे रमेश बाला यांनी म्हटले.
-
याबरोबरच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादीही त्यांनी शेअर केली आहे. त्यात कोणते चित्रपट आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
-
बाहुबली २
-
२.०
-
कबाली
-
साहो
-
आरआरआर
-
केजीएफ २
-
पठाण
-
शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषेत जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा