-
सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने तिचा बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू केएल राहुलशी सोमवारी (२३ जानेवारी) लग्नगाठ बांधली.
-
या जोडप्याने सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये लग्न केलं.
-
अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाला अगदी मोजकेच पाहुणे उपस्थित होते.
-
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या विधींना शनिवारी सुरुवात झाली होती.
-
रविवारी रात्री, कुटुंबाने कॉकटेल नाईटसह संगीत सोहळ्याचे आयोजन केले होते.
-
यात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी लग्न पार पडलं.
-
लग्नानंतर आता अथिया आणि केएल राहुलच्या हळदी सभारंभाचे फोटो समोर आले आहेत.
-
अथिया आणि केएल राहुलने एकत्र हळदी सभारंभ साजरा केला.
-
अथिया आणि केएल राहुलच्या हा सोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने पार पडला.
-
यातील एका फोटोत अथियाच्या हातात पानाचा विडा पाहायला मिळत आहे.
-
तर एका फोटोत काही महिला तिला ओवाळताना दिसत आहेत.
-
अथियाने हे फोटो शेअर करत करताना मराठीत कॅप्शन दिले आहे.
-
तिने या फोटोला ‘सुख’ असे कॅप्शन दिले. त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”