-
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असते.
-
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या अपघातानंतर ती चर्चेत आली होती.
-
सध्या उर्वशी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे ते म्हणजे तिने दाक्षिणात्य चित्रपटात एक आयटेम सॉंग केले आहे.
-
विशेष म्हणजे तिच्याबरोबर या गाण्यात मेगास्टार चिरंजीवीदेखील थिरकताना दिसून येत आहे.
-
‘वॉल्टेअर वीरैया’ या चित्रपटात ‘बॉस पार्टी’ या गाण्यावर तिने आपल्या अदा दाखवल्या आहेत
-
माध्यमांच्या माहितीनुसार उर्वशीने ३ मिनिटांच्या गाण्यासाठी सुमारे २ कोटी रुपये आकारले आहेत.
-
उर्वशी आणि चिरंजीवीच्या या गाण्यासाठी तब्बल ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
-
हे गाणे देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे आणि नकाश, अझीझ, डीएसपी आणि हरिप्रिया यांनी ते स्वरबद्ध केले आहे.
-
उर्वशी लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रणदीप हुडादेखील असणार आहे. तसेच ती मिशेल मॉरोनबरोबर हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…