-
मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून निर्मिती सावंत यांना ओळखले जाते.
-
निर्मिती सावंत या आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
निर्मिती सावंत यांनी विनोदी अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली असली तर त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
-
निर्मिती सावंत यांना कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते.
-
काही वर्षांपूर्वी त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत बॉडी शेमिंगबद्दल भाष्य केले होते.
-
त्यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराने त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली.
-
निर्मिती सावंत यांनी २०२१ मध्ये हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाच्या निर्मिती म्हणून महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
त्यावेळी निर्मिती सावंत यांनी बॉडी शेमिंगबद्दल तुमचा काही अनुभव आहे का? जर तुम्ही सडपातळ असता तर तुम्हाला भूमिका मिळाल्या असत्या असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
याबद्दल त्या म्हणाल्या, “मी जशी आहे, अगदी तसंच प्रेक्षकांनी मला स्वीकारलं. त्यामुळे मला कधीही बॉडी शेमिंगचा अनुभव आलेला नाही.”
-
“बारीक असणाऱ्या कितीतरी अभिनेत्री आहेत ज्या सर्व प्रकारच्या भूमिका करू शकतात.”
-
“पण माझ्यासारख्या खूप कमी आहेत ज्या सर्व प्रकारच्या भूमिका करू शकतात.”
-
“मी खूप सकारात्मक व्यक्ती आहे.”
-
“काही गोष्टी घडल्यानंतर त्याचं दु:ख करण्यापेक्षा, त्यातून एखादी तरी चांगली गोष्ट आपल्याला मिळते.”
-
दरम्यान निर्मिती सावंत यांचा बहुचर्चित सिनेमा ‘झिम्मा’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘झिम्मा २’ चा टीझर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये निर्मिती आणि अभिनेते अनंत जोग पुन्हा एकदा मजेशीर संवाद करताना दिसले.
-
हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय ‘झिम्मा २’ या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत.
-
चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित हा चित्रपट येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
