-
बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे वर्षभरापूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले.
-
नुकतंच प्रियांकाने तिच्या लेकीचा चेहरा दाखवला आहे.
-
प्रियंका चोप्राने एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
यावेळी जोनस ब्रदर्स, निक जोनस हे सर्वजण उपस्थित होते.
-
यावेळी प्रियांका ही मालतीला हातात घेऊन पहिल्या रांगेत बसलेली पाहायला मिळाली.
-
याचा एक व्हिडीओही प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
प्रियांका चोप्रा-निक जोनसची मुलगी मालतीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते फारच उत्सुक होते. अखेर तिची झलक सर्वांसमोर आली आहे.
-
प्रियांका आणि निकची लेक हुबेहुब वडिलांसारखीच दिसत आहे.
-
तिचा गोंडस चेहरा, निरागस डोळे, इवलेशे हात-पाय यामुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
-
यावेळी प्रियांकाने मालतीला छान स्वेटशर्ट परिधान केले होते. त्याबरोबरत तिने मॅचिंग हेअरबँडही लावला होता.
-
दरम्यान प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये जोधपुर येथे निक जोनससह लग्न केलं होतं.
-
त्यानंतर २०२२ मध्ये प्रियांकाने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला. (सर्व फोटो – AP)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं