-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीवला ओळखले जाते. आज सायली संजीव तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
विशेष म्हणजे आज क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडचाही वाढदिवस आहे.
-
सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या आयपीएलपासून रंगल्या आहेत.
-
ऋतुराजने सायलीच्या वनपीस घातलेल्या फोटोवर कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या.
-
ऋतुराजने तिच्या त्या फोटोवर वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते.
-
त्यावर सायलीनेही हार्ट इमोजी शेअर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यानंतरच त्यांच्या अफेरच्या चर्चांना उधाण आले होते.
-
मात्र काही महिन्यांपूर्वी ‘बस बाई बस’ या कार्यक्रमावेळी सायली संजीवने यावर थेट भाष्य केले होते.
-
‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांनी सायलीला ऋतुराजबद्दल प्रश्न विचारला.
-
त्यानंतर तिने रिलेशनशिपबद्दलच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले.
-
“मी आणि तो फार चांगले मित्र आहोत.”
-
“खरं सांगायचं तर आयपीएल खेळणाऱ्यांपैकी दोन-तीन माझे चांगले मित्र आहेत.”
-
“त्यातील एक रॉयल चॅलेंजर बँगलोर, ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज, तुषार देशपांडे हा पण चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आहे.”
-
“पण हे सर्वजण माझे खरंच खूप चांगले मित्र आहेत.”
-
“त्यांना माझी ‘काही दिया परदेस’ ही मालिका फार आवडायची. ते ती मालिका बघायचे.”
-
“मला ही गोष्ट कळल्यानंतर मी जरा चकितच झाले. क्रिकेटपटू ही मालिका का बघतात हेच मला कळत नव्हते.”
-
“एकतर ते तिघेही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत”, असे तिने उत्तर यावेळी दिले.
-
त्याबरोबर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही यावर स्पष्टीकरण दिले होते.
-
यावेळी सायलीला ऋतुराजवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवरुन विचारणा करण्यात आली होती.
-
त्यावर ती म्हणाली, “आपण ‘नो कमेंट्स’ म्हणून ती गोष्ट सोडून देऊ शकतो. मात्र, मला या गोष्टींना सामोरं जाणं महत्त्वाचं वाटतं.”
-
“मी पळ काढत नाही. काहीच नसताना नाव जोडलं जातंय याचा वैयक्तिक आयुष्यात नक्कीच त्रास होतो.”
-
“तुमची चूक नसताना या गोष्टींना तोंड द्यावं लागतं.”
-
“अफवांना किती प्राधान्य द्यायचं, हे स्वतःशी ठरवलं की गोष्टी सोप्या होतात.”
-
“आपण उगाच ट्रोल करतोय, हे ट्रोलर्सना कळावं, एवढीच माझी इच्छा आहे”, असे त्यावेळी सायली म्हणाली होती.
-
सायलीच्या या उत्तरानंतर त्या दोघांचे रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही याबद्दल अजूनही चाहत्यांना शंका आहे. पण तिने मात्र यावर टाळाटाळ केली आहे.
-
दरम्यान सायली ही ‘काही दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
-
त्याबरोबरच तिची प्रमुख भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपटही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच