-
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरात पोहोचली.
-
हास्यजत्रेतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी वनिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह वनिता २ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहे.
-
वनिता व सुमितच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
-
नुकताच वनिताचा मेहेंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.
-
वनिताने मेहेंदी सोहळ्यासाठी खास हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
वनिताच्या हातावर रंगली सुमितची मेहेंदी.
-
मेहंदी रंगली गं…
-
सुमितनेही हातावर मेहेंदी काढली.
-
वनिताच्या मेहेंदी सोहळ्यात हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
शिवाली परब, चेतना भट्ट, रसिका वेंगुर्लेकर, प्रियदर्शिनी वनिताच्या मेहेंदी सोहळ्यासाठी उपस्थित होते.
-
वनिताच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
वनिता व सुमितने केलेल्या प्रीवेडिंग फोटोशूटचे फोटोही व्हायरल झाले होते.
-
लग्नकार्याला काहीच दिवस शिल्लक राहिल्याने वनिता व सुमितच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
-
नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
-
वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे.
-
वनिता व सुमितला चाहत्यांनी फोटोवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.(सर्व फोटो: वनिता खरात/ इन्स्टाग्राम)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल