-
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे.
-
जॅकी श्रॉफ यांना ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जाते.
-
त्यांनी सुभाष घई यांच्या ‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केलं होतं.
-
जॅकी यांनी अलीकडेच एक मुलाखत दिली. यात त्यांनी त्यांचा जयकिशन श्रॉफचे जॅकी श्रॉफ याचा प्रवास उलगडला.
-
जॅकी याचं मुळ नाव जयकिशन श्रॉफ होतं.
-
त्यांना त्यांचे चाहते प्रेमाने जग्गुदादा म्हणतात.
-
या मुलाखतीत बोलताना त्यांनी ते जयकिशन श्रॉफचे जॅकी श्रॉफ कसे बनले, याबाबतही खुलासा केला.
-
जॅकी श्रॉफ यांचा जन्म मुंबईच्या चाळीत झाला होता. त्यांचं तरुणपणही तिथेच गेलं.
-
त्यांचा चाळीपासूनचा ते बॉलिवूड सुपरस्टार होण्यापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
-
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले, “माझी आई मला जग्गू म्हणायची आणि माझे वडील मला जयकिशन म्हणायचे.”
-
“माझे मित्र मला जग्गू बाबा म्हणायचे.”
-
“तर काही जण मला जय म्हणायचे, तर काही किशन म्हणून हाक मारायचे.”
-
“माझी खूप नावं आहेत, तुम्ही मला कोणत्याही नावाने हाक मारा, पण प्रेमाने हाक मारा इतकंच.”
-
“मी शाळेत असताना माझा एक मित्र होता. तो हाँगकाँग की दुबईहून आला होता.”
-
“त्याला माझं जयकिशन नाव खूप मोठं वाटत होतं.”
-
“त्यामुळे माझ्या नावाशी थोडं खेळायला हवं असं त्याला वाटलं.”
-
“त्याने मला जय-की या नावाने हाक मारायला सुरुवात केली.”
-
“यानंतर ते जय-कीचं जॅकी झालं.”
-
“माझी नावं बदलत राहतात. पण मी मात्र अजूनही तोच आहे.”
-
दरम्यान, जॅकी श्रॉफ शेवटचे कतरिना कैफ, इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याबरोबर ‘फोन भूत’ चित्रपटात दिसले होते.
-
काही दिवसांपूर्वी ते ‘लाईफ्स गूड’ या चित्रपटात झळकले.

अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक