-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात आज विवाहबंधनात अडकणार आहे. वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे.
-
वनिता व सुमितच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मेहेंदी व हळदी कार्यक्रमातील फोटो व्हायरल होत आहेत.
-
सुमित व वनिताने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा एका मुलाखतीदरम्यान सांगितला.
-
सुमित व वनिता एका पिकनिक दरम्यान पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.
-
त्याआधी ते एकमेकांचे चांगले मित्र होते. लॉकडाऊनमध्ये लुडो खेळताना त्यांच्यात घट्ट मैत्री झाली होती.
-
सुरुवातीला ग्रुपमध्ये लुडो खेळणारे वनिता व सुमित नंतर दोघेच लुडो खेळू लागले.
-
पिकनिकला भेटल्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पण रिलेशनशिप व अफेअर या गोष्टी वनिताला नको होत्या.
-
त्यामुळे वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
२०२२च्या जानेवारीत त्यांनी कुटुंबियांना लग्न करणार असल्याचं सांगितलं. दोघांच्याही घरुन संमती मिळाल्यानंतर आता ते विवाहबंधनात अडकत आहेत.
-
वनिताने ऑक्टोबर महिन्यात सुमितच्या वाढदिवशी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.
-
वनिता व सुमित अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.
-
त्यांनी केलेल्या प्रीवेडिंग फोटोशूटची बरीच चर्चा रंगली होती.
-
वनिताने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तर सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे.
-
आता वनिता व सुमित विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. (सर्व फोटो: वनिता खरात/ इन्स्टाग्राम)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल