-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात ही नुकतीच विवाहबंधनात अडकली.
-
वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली.
-
मोजक्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
-
आता वनिताच्या लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
-
वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज आणि पैठणी शेला असा मराठमोळा लूक केला होता.
-
त्याबरोबर तिने पारंपरिक दागिनेही परिधान केले होते.
-
तर सुमितने शेरवानी आणि फेटा बांधत शाही लूक केला होता.
-
त्यानंतर या दोघांनी रिसेप्शनला साडी आणि ब्लेझर असा वेस्टर्न लूक केला होता.
-
यावेळी वनिताने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर सुमीत हा निळ्या रंगाच्या सूट-बुटात पाहायला मिळाला.
-
वनिता आणि सुमित लोंढे यांच्या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यांच्या मेहंदी आणि हळदी सोहळ्यातील फोटोही व्हायरल झाले होते.
-
वनिता व सुमितच्या लग्नात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांनी तिच्या लग्नात केलेल्या खास डान्सचीही सध्या चर्चा सुरु आहे.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO