-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली.
-
वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेबरोबर सप्तपदी घेत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
-
नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला.
-
वनिताच्या लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
-
त्याबरोबर वनिताने तिच्या लग्नावेळी घेतलेल्या खास उखाण्यांची चर्चाही रंगताना दिसत आहे
-
वनिताने स्वत:च्या लग्नात दोन उखाणे घेतले.
-
“टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा, टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा…सुमित, तूच माझा महाराष्ट्र तूच माझी हास्यजत्रा”, असा खास उखाणा वनिताने सुमितसाठी घेतला.
-
त्यानंतर सुमित लोंढेनेही वनितासाठी उखाणा घेतला.
-
“तू दिसतेस फार सुंदर साडीवर, तू दिसतेस फार सुंदर साडीवर, इथून पुढे तुला फिरवणार आहे माझ्या गाडीवर, असा उखाणा सुमितने वनितसााठी घेतला.
-
त्याचा हा उखाणा ऐकून वनिताने ‘अग्गबाई’ असं म्हटलं.
-
विशेष म्हणजे यानंतर वनिताने सुमितसाठी आणखी एक उखाणा घेतला.
-
“कबीर सिंगच्या नादात पुष्पा देशभर पळाली, कबीर सिंगच्या नादात पुष्पा देशभर पळाली, वनिताची प्रीत अखेर सुमीतलाच मिळाली”, असा उखाणा वनिताने घेतला.
-
त्यांच्या या उखाण्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
-
वनिताचा नवरा सुमित एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे.
-
लॉकडाऊनमध्ये ते एकत्र लुडोही खेळायचे. मैत्रीचं रुपातंर प्रेमात झाल्यानंतर वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल