-
बॉलिवूड अभिनेता आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन आज आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
अभिषेक बच्चनचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ मध्ये झाला.
-
अभिषेक बच्चन सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतो.
-
विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतात.
-
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात.
-
या दोघांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असली तरी त्याच्यातील प्रेम अद्याप कायम आहे.
-
या दोघांना अनेकजण आदर्श कपल समजतात.
-
मात्र एकदा ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात जोराचे भांडण झाले होते.
-
यामुळे ऐश्वर्याने अभिषेकला सलग दोन दिवस बेडरुमच्या बाहेर काढले होते.
-
त्यामुळे अभिषेकला घराच्या हॉलमध्ये त्याच्या दोन्ही रात्री घालवाव्या लागल्या होत्या.
-
अभिषेक आणि ऐश्वर्याचा हा किस्सा २०१४ चा आहे.
-
२०१४ मध्ये अभिषेक हा आपल्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात चेन्नईच्या सत्यभामा विद्यापीठात गेला होता.
-
त्यावेळी त्याची ओळख त्या ठिकाणच्या विद्यापीठाचे संस्थापक कर्नल जेपिआर यांच्याशी झाली.
-
ते अभिषेकला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्याचे ऑफिस फार लहान होते.
-
त्यात दोन-चार खुर्च्यांशिवाय एक डेस्क होता. त्याव्यतिरिक्त त्याच्या ऑफिसमध्ये काहीही नव्हते.
-
त्यावेळी त्यांनी त्यांना मिळालेल्या सर्व ट्रॉफी या जमिनीवर ठेवल्या होत्या.
-
हे पाहून अभिषेकला आश्चर्य वाटले.
-
“तुम्ही या सर्व ट्रॉफी जमिनीवर का ठेवलात?” असा प्रश्न अभिषेकने कर्नल जेपिआर यांना विचारला होता.
-
“मी या सर्व ट्रॉफी जमिनीवर ठेवण्यामागचे कारण म्हणजे हे पुरस्कार जिंकलेल्या विजयाची नशा माझ्या डोक्यात जाऊ नये,” असे त्यांनी सांगितले.
-
कर्नलची ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर अभिषेक हा भारावून गेला.
-
यानंतर चेन्नईतून मुंबईत आल्यावर अभिषेकने आपल्या घरीही हेच करावं असा विचार केला.
-
त्यानंतर त्याने त्याच्या घरातील बेडरुममध्ये ऐश्वर्याच्या सर्व ट्रॉफी जमिनीवर ठेवल्या.
-
यामुळे त्यांचे संपूर्ण बेडरुम ट्रॉफीने भरुन गेले.
-
हा सर्व प्रकार पाहिल्यावर ऐश्वर्या मात्र खूप भडकली.
-
यानंतर तिने मला असं करण्याचे कारण विचारले.
-
त्यावेळी मी तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला.
-
मी ऐश्वर्याला जमिनीवर ट्रॉफी ठेवण्याचे कारणही सांगितले.
-
पण ती इतकी चिडली होती की तिने मला सरळ खोलीबाहेर जा, असे सांगितले.
-
ऐश्वर्याच्या या रागामुळे मला दोन रात्री बेडरुमच्या बाहेर काढाव्या लागल्या. त्या काळात मी हॉलमध्ये झोपलो होतो, असा किस्सा अभिषेकने सांगितला होता.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल