-
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी.
-
आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर यांना स्वर्गवासी होऊन आज एक वर्ष पूर्ण होतंय.
-
आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला.
-
आपल्या आवाजाने लाखोंच्या मनावर राज्य करणाऱ्या दीदी केवळ भारतात नाही तर विदेशातही तितक्याच प्रसिद्ध होत्या.
-
एक अद्भूत गायिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.
-
लतादीदी यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
-
त्यांनी बालपणापासूनच खूप संघर्ष केला.
-
लतादीदी या अनेकदा पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायच्या.
-
एकदा एका मुलाखतीत त्यांना याबाबत प्रश्नही विचारला गेला होता.
-
लतादीदी तुम्ही नेहमी पांढऱ्या रंगाची साडी का परिधान करता? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
-
यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मला लहानपणापासून पांढरा रंग फार आवडतो.”
-
“मी लहान असताना घागरा चोळी घालायची ती ही पांढऱ्या रंगाची असायची.”
-
“पण काही वर्षांपूर्वी एकदा मी रंगीत साड्या नेसायला सुरुवात केली होती.”
-
“त्यावेळी मी प्रत्येक रंगाच्या साड्या नेसायची.”
-
“पण एक-दोन वर्षांनी अचानक असे वाटले की याला काही अंत नाही.”
-
“मला आज गुलाबी, उद्या पिवळा आणि परवा निळा हे रंग आवडतील.”
-
“म्हणून मी आजपासून पांढऱ्या रंगाशिवाय काहीही घालणार नाही असा निर्णय घेतला”, असेही लतादीदी सांगितले होते.
-
विशेष म्हणजे त्या अनेकदा केसातही पांढऱ्या रंगाची फुले माळायच्या.
-
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती.
-
त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते.
-
(सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेस)

झटका मटणासाठी नितेश राणेंनी आणलं मल्हार प्रमाणपत्र; म्हणाले, “सर्टिफिकेट नसेल तर हिंदूंनी…”