-
अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांची लगीनघाई सुरू झाली आहे.
-
मागच्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेले सिद्धार्थ-कियारा आता लग्नगाठ बांधत वैवाहिक जीवनाची सुरुवात करणार आहेत.
-
दोघेही राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न करतील.
-
त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली असून पाहूणे राजस्थानला पोहोचत आहेत.
-
दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाल्यापासून त्यांचे चित्रपट व एकूण संपत्ती यांचीही चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
-
आपण सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी यांच्या एकूण संपत्तीबद्दल व त्यांनी करिअरमध्ये किती चित्रपट केले आहेत, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा महिन्याला ५० लाख रुपये कमवतो व वर्षाकाठी तो ७ कोटी रुपये कमावतो.
-
सिद्धार्थ एका चित्रपटासाठी ७ ते १० कोटी रुपये मानधन घेतो.
-
याशिवाय तो एका जाहीरातीसाठी ३ कोटी रुपये घेतो.
-
सिद्धार्थची एकूण संपत्ती १०० कोटींच्या घरात आहे.
सिद्धार्थचे मुंबईतील पाली हिल्स भागात आलिशान अपार्टमेंट आहे. -
‘फगली’ चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या कियाराजवळ ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
ती एका चित्रपटासाठी ३ कोटी रुपये घेते. ती महिन्याला ३० ते ३५ लाख रुपये कमावते.
-
तिची नेट वर्थ ३५ कोटींच्या जवळपास आहे.
-
याशिवाय तिचं मुंबईत आलिशान घर असून त्याची किंमत १५ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय.
-
कियाराने आतापर्यंत १६ चित्रपट केले आहेत.
-
तर, सिद्धार्थ मल्होत्राने आतापर्यंत १४ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
या दोघांनी ‘शेहशाह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
-
कियारा व सिद्धार्थ यांच्याकडे महागड्या गाड्यादेखील आहेत. सर्व फोटो – (सिद्धार्थ-कियाराच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे