-
बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल राखी सावंत तिच्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
पती आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा राखीने केला आहे. त्यामुळे त्यांच्या संसारात वादळ आलं आहे.
-
राखीच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यानंतर राखीने आदिल खानवर फसवत असल्याचे आरोप केले होते.
-
आता आदिल व राखी एकत्र राहत नसून त्याने घर सोडलं आहे. आदिल त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर राहत असल्याचं राखीने सांगितलं आहे.
-
राखीने कॅमेऱ्यासमोर आदिलच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर केलं आहे. ‘तनु’ असं आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव असल्याचं राखी म्हणाली आहे.
-
राखीने याबरोबरच आदिलवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. “माझी आई आदिल खानमुळे गेली. आदिलने तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत”.
-
“तिच्यावर वेळीच उपचार झाले असते, तर माझी आई कदाचित आज जिवंत असती”, असं राखी म्हणाली आहे.
-
आदिलने बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तिचा वापर करुन घेतल्याचं राखीचं म्हणणं आहे.
-
“आदिलने बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझा वापर केला. माझ्याकडचे सगळे पैसे त्याने घेतले. माझ्याकडे याचे सगळे पुरावे आहेत”, असं राखी म्हणाली आहे.
-
“त्याने माझा मानसिक, शारीरिक व भावनिक वापर केला आहे. त्याच्यावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत, लग्नानंतर हे मला माहीत झालं”, असं म्हणत राखीने आदिलबाबत धक्कादायक विधान केलं आहे.
-
आदिल व राखीने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर जूनमध्ये त्यांनी निकाहही केला होता.
-
‘बिग बॉस’मधून बाहेर येताच राखीने याचा खुलासा केला होता. तेव्हाही आदिलने राखीबरोबरचं लग्न मान्य करण्यास नकार दिला होता.
-
त्यानंतर थोड्या दिवसांनी आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं.
-
(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?