-
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
कियारा आणि सिद्धार्थ डेस्टिनेशन वेडींग करणार आहेत.
-
त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली आहे.
-
राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेस ते दोघेही विवाहबद्ध होणार आहेत.
-
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसची सातत्याने चर्चा सुरु आहे.
-
आज आपण हा सूर्यगढ पॅलेस नक्की कसा आहे? त्याच्या बुकींगसाठी किती खर्च येतो? आणि याचे एका दिवसाचे भाडे किती? याबद्दल जाणून घेणार आहोत.
-
राजस्थानमधील जैसलमेर हे शहर संस्कृती, परंपरा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
-
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नामुळे सध्या जैसलमेर शहर आकर्षक रोषणाईने उजळले आहे.
-
करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांसह अनेक कलाकार हे जैसलमेरला पोहोचले.
-
राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर आहे.
-
हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे.
-
हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.
-
या पॅलेसच्या बाहेर दोन मोठे गार्डन आहेत. याच ठिकाणी मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे आयोजन केले जाते.
-
राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा रॉयल डेस्टिनेशन इंडियाच्या सर्वाधिक प्रिय पॅलेसपैकी एक आहे.
-
या अलिशान पॅलेसची रचना पिवळ्या रंगाच्या दगडांनी करण्यात आली आहे.
-
या पॅलेसमध्ये ८४ खोल्या, ९२ बेडरूम, कृत्रिम तलाव, व्हिला, रेस्टॉरंट आणि पाहुण्यांसाठी अनेक उत्कृष्ट सुविधा आहेत.
-
या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारं भाडंही तितकंच मोठं आहे.
-
जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्याचं असल्यास १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते.
-
तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो.
-
या पॅलेसमध्ये २५० स्क्वेअर फूट रुममध्ये एक दिवस राहण्यासाठी २० ते ३० हजार रुपये भाडं आकारण्यात येतं.
-
तर या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडं आकारलं जातं.
-
विशेष म्हणजे या पॅलेसमध्ये मोठमोठे झुंबर आणि पाहुण्यांची बैठक व्यवस्थाही पाहायला मिळत आहे.
-
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात येणार आहे.
-
तसेच लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना खास राजस्थानी नृत्याची झलक पाहायला मिळणार आहे.
-
सिद्धार्थ व कियाराच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबीय, जुही चावला, मनिष मल्होत्रासह अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
-
लग्नातील पाहुण्यांसाठी सिद्धार्थ-कियाराने पॅलेसवर चोख बंदोबस्तही ठेवला आहे.
-
(सर्व फोटो – सूर्यगढ जैसलमेर/ इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच