-
एकेकाळी बॉलिवूडमधील टॉपची जोडी असलेल्या रवीना टंडन व अक्षय कुमारच्या अफेअरची खूप चर्चा होती.
-
दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि साखरपुडाही केला होता. पण लग्नापूर्वीच त्यांचा साखरपुडा मोडला होता.
-
आता जवळपास दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतर रवीनाने यावर मौन सोडलं आहे.
-
एएनआयशी बोलताना रवीना म्हणाली, “इतकी वर्षे उलटली आहे, पण जेव्हा माझं नाव गुगल केलं जातं, तेव्हा त्याचं नावही येतं, त्या चॅप्टरचा उल्लेख होतोच.”
-
पुढे ती म्हणाली, “पण, जर मी त्याच्या आयुष्यातून निघून गेले होते, तर या सर्व गोष्टींना अर्थ उरत नाही. कारण मी आधीच दुसर्याला डेट करत होते आणि तोही दुसर्या कुणाला तरी डेट करत होता, मग मला वाईट का वाटेल?”
-
आपण अक्षयबरोबर साखरपुडा केव्हा केला होता, हे विसरल्याचंही यावेळी रवीना म्हणाली.
-
त्याचं कारण सांगताना आपण त्या प्रकरणाच्या बातम्या कधीच न वाचायचं ठरवलं होतं, असं रवीना म्हणाली.
-
“मोहराच्या काळात आम्ही एक हिट जोडी होतो आणि आताही, जेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना कुठेतरी भेटतो, आम्ही सर्व गप्पा मारतो आणि पुढे जातो”, असं तिने सांगितलं.
-
एक उदाहरण देत रवीना म्हणाली, हल्ली तर कॉलेजमध्ये मुली दर आठवड्याला बॉयफ्रेंड बदलत असतात, पण तुटलेला साखरपुडा का अजूनही माझ्या डोक्यातून जात नाही?”
-
“खरं तर प्रत्येकजण आयुष्यात पुढे जातो, लोकांचे घटस्फोट होतात, ते मूव्ह ऑन करतात, साखरपुडा तुटणं ही काय खूप मोठी गोष्ट आहे का?” असा प्रश्नही तिने केला.
-
रवीनाशी ब्रेकअप झाल्यामुळे अक्षयने तिच्यासारख्या दिसणाऱ्या ट्विंकल खन्नाला डेट केलं होती, अशाही चर्चा खूप रंगल्या होत्या.
-
याबाबत विचारलं असता “मी त्याबद्दल लिहिलेले काहीही वाचणार नाही, कारण गरज नसताना मी माझा रक्तदाब का वाढवू?” अशी प्रतिक्रिया रवीनाने दिली.
-
दरम्यान, ब्रेकअपनंतर रवीनाने अनिल थडानीशी लग्न केलं होतं.
-
तर, अक्षय कुमारनेही अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्नगाठ बांधली होती.
-
(सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई