-
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज ७ फेब्रुवारी लग्नबंधनात अडकले.
-
राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली.
-
आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ते दोघेही नववधू-वराच्या वेषात फारच सुंदर दिसत आहेत.
-
सिद्धार्थ-कियारा या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
-
“आता आमची कायमस्वरुपी बुकींग झाली आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम राहू द्या”, असे कॅप्शन त्यांनी हे फोटो शेअर करताना दिले आहेत.
-
यावेळी सिद्धार्थने गोल्डन रंगाची शेरवानी, फेटा असा लूक केल्याचे दिसत आहे.
-
तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. याबरोबर तिने हिरव्या रंगाचा नेकलेस, बिंदी असा लूक केला होता.
-
त्यांनी शेअर केलेल्या पहिल्या फोटोत ते दोघेही एकमेकांसमोर हात जोडून हसताना दिसत आहे.
-
तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करत आहेत.
-
त्यानंतर त्या दोघांनीही एकमेकांच्या गालावर किस करतानाचा फोटो शेअर केला आहे.
-
दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराने यांच्या लग्नाचे विधी राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये पार पडले.
-
(सर्व फोटो – सिद्धार्थ मल्होत्रा/कियारा अडवाणी- इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख