-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात अलीकडेच विवाहबंधनात अडकली.
-
वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे याच्यासोबत २ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नसोहळ्याची विशेष चर्चाही रंगली.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील जवळपास सर्वच कलाकारांनी तिच्या या खास सोहळ्यात उपस्थिती दर्शवली होती.
-
अगदी मेहंदीपासून रिसेप्शनपर्यंत हे कलाकार वनिता-सुमितच्या आनंदात सहभागी झाले होते.
-
या सर्वच कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
यानंतर आता अभिनेत्रीचे कोकणातील काही फोटो समोर आले आहेत. ती सुमितसह देवदर्शनासाठी कोकणात पोहोचली आहे.
-
यावेळी वनिताच्या गळ्यातील मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. (फोटो – Itsmajja/ इन्स्टाग्राम)
-
वनिताने नव्या नवरीच्या श्रृंगाराप्रमाणे गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र परिधान केले होते.
-
यावेळी वनिताने मुहूर्तमणी, छोटं मंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र असे तीन दागिने परिधान केले होते.
-
वनिताने परिधान केलेल्या मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
तिच्या तिन्ही मंगळसूत्राचे डिझाईन फारच हटके आहे.
-
कोकणातील देवदर्शनावेळी वनिताने साडी आणि पंजाबी ड्रेस असा पारंपारिक लूक केला होता.
-
तर सुमितने ट्रेडिशनल कुर्ता परिधान केला होता.
-
वनिता खरात- सुमित लोंढे या दोघांनी गुरुवारी २ फेब्रुवारीला सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
-
यानंतर शनिवारी ४ फेब्रुवारीला सुमितच्या घरी सत्यनारायणाची पूजा पार पडली. या पूजेवेळी त्या दोघांनी पारंपारिक लूक केला होता.
-
त्यावेळीही तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरले होते.
-
दरम्यान वनिताचा नवरा सुमित एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे.
-
एका पिकनिकमध्ये वनिता व सुमित एकमेकांना भेटले. आधीपासूनच मित्र असलेल्या वनिता व सुमितची पिकनिकनंतर घट्ट मैत्री झाली.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”