-
बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली.
-
राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये त्या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
सिद्धार्थ-कियाराच्या विवाहसोहळ्याला विविध बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाचे फोटो शेअर केले होते.
-
लग्नानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ आणि कियारा दिल्लीतील त्यांच्या घरी दाखल झाले.
-
यावेळी सिद्धार्थच्या कुटुंबियांनी ढोल-ताशांनी अगदी थाटात सूनचे स्वागत केले.
-
त्या दोघांनीही पापाराझींना फोटोसाठी एकत्र पोझ दिली.
-
यावेळी सिद्धार्थ लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
तर कियाराने लाल रंगाचा सलवार ड्रेस घातला होता.
-
कियाराने यावेळी भांगेत कुंकू, हातात चुडा, अंगठी असा लूक केला होता.
-
त्यावेळी कियाराने गळ्यात परिधान केलेल्या मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
कियाराने परिधान केलेले मंगळसूत्र अत्यंत नाजूक पण सुंदर आहे.
-
कियाराने तिचे मंगळसूत्र सोन्याच्या चैनीत बनवलं आहे.
-
कियाराच्या मंगळसूत्रात मोजके काळे मणी आणि एक डायमंडचं पेंडेंट पाहायला मिळत आहे.
-
सध्याच्या मंगळसूत्राच्या ट्रेंडनुसार तिने हे मंगळसूत्र केलं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे.
-
त्याबरोबर या फोटोत तिच्या डायमंड अंगठीचीही झलक पाहायला मिळाली.
-
कियाराच्या या मंगळसूत्राच्या डिझाइनची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.
-
नवी नवरी असलेल्या कियाराचा हा लूक पाहून सर्वजण थक्क झाले.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती