-
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच तिच्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. ती नेहमी तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी उघडपणे सांगताना दिसते.
-
सारा लहान असताना तिचे आई-वडील सैफ अली खान आणि अमृता सिंग दोघे विभक्त झाले होते.
-
अमृता सिंगबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सैफने करीना कपूरशी लग्न केले.
-
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नावेळी सारा ही १६-१७ वर्षांची होती.
-
साराला तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजल्यानंतर तिची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल नुकतंच तिने खुलासा केला आहे.
-
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
करीनाशी लग्न करण्याापूर्वी सैफने बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगबरोबर केले होते. ते १९९१ मध्ये विवाहबद्ध झाले.
-
सैफ आणि अमृता यांच्या वयात १२ वर्षाचे अंतर होते. तरी देखील त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
पण काही कारणांमुळे त्यांच्याच मतभेद होऊ लागले आणि २००४ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
-
त्या दोघांनाही सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुलं आहे.
-
सैफबरोबर घटस्फोट झाल्यानंतर अमृता सिंग ही एकटी पडली होती.
-
अमृता सिंगबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सैफने करीना कपूरशी लग्न केले.
-
सैफ आणि करीनाची पहिली भेट ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टशन’ या चित्रपटादरम्यान झाली होती.
-
सैफ आणि करीना हे बरेच वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते.
-
त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी कोर्टात जाऊन शासकीय पद्धतीने लग्न केले.
-
सैफने दुसरे लग्न केले तेव्हा सारा १६-१७ वर्षांची होती.
-
त्यावेळी अमृताने स्वत: साराला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दलची माहिती दिली होती.
-
यानंतर सारा अली खानला याचं काहीही वाईट वाटले नव्हते.
-
त्याउलट साराने आईला “तू लग्नात काय परिधान करणार आहेस?” असा प्रश्न विचारला होता.
-
अमृता सिंगला सैफ अली खानच्या लग्नाची माहिती मिळाल्यानंतर तिने सर्वात आधी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांना फोन केला होता.
-
माझ्या आईने डिझाईनर्सला फोन केला आणि त्यावेळी ती त्यांना म्हणाली होती की, सैफच्या लग्नावेळी सारा ही सर्वात सुंदर दिसावी, असे सांगितले होते.
-
सैफच्या लग्नात साराच्या लूकची बरीच चर्चा झाली होती.
-
तिने खूप सुंदर अनारकली ड्रेस परिधान केला होता.
-
सैफ अली खानच्या दुसऱ्या लग्नासाठी साराला पाठवण्याबद्दल अमृता सिंगचेही खूप कौतुक झाले होते.
-
“माझ्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला जाणे माझ्यासाठी इतके सोपे नव्हते. पण हे सर्व माझ्या आईमुळे शक्य झाले”, असे तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
-
अमृता आणि सैफने घरातील लोकांच्या विरोधात जाऊन १९९१ मध्ये लग्न केले. पण त्यानंतर फार काळ त्यांचा संसार टिकला नाही.
-
सैफ २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसह विवाहबंधनात अडकला. करीना सैफपेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
-
करीना सैफपेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
-
त्या दोघांना दोन मुलं असून तैमूर आणि जहांगीर अशी त्यांची नाव आहेत.

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित