-
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले.
(Photo: Kiara Advani/Instagram) -
राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. दोघांनी या लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. कियारा व सिद्धार्थच्या व्हायरल फोटोंमध्ये ते दिसून आलं. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
कियारा व सिद्धार्थच्या लग्नामध्ये सगळं काही खास होतं. दोघांच्या लग्नाबाबत बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. लग्नादरम्यानचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली होती. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
कियारा व सिद्धार्थचं लग्न नेमकं कसं झालं हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले होते. अखेरीस कियाराने लग्नाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.(Photo: Kiara Advani/Instagram)
-
या व्हिडीओमध्ये कियारा व सिद्धार्थ एकमेकांना हार घालताना दिसत आहे. तर कियाराने अगदी आनंदाने नाचत एण्ट्री केली असल्याचं पाहायला मिळालं. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
कियारा व सिद्धार्थ यांनी एकमेकांना हार घालताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
तसेच कियारा व सिद्धार्थने एकमेकांना किस केलं. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
दोघंही या व्हिडीओमध्ये सुंदर दिसत आहेत. तसेच त्यांच्या लग्नाचा राजेशाही थाट व्हिडीओमध्ये दिसून येतो (Photo: Kiara Advani/Instagram)
-
तिने कॅप्शनमध्ये “7.02.2023 ??❤️♾️” असं लिहिलं होतं. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटी मंडळी कमेंट करत आहेत. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
दोघांनाही चाहते शुभेच्छा देत आहेत. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
दोघांच्या लग्नाच्या फोटोंना आणि व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.(Photo: Kiara Advani/Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”