-
छोट्या पडद्यावरुन महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून निखिल बनेला ओळखले जाते.
-
काही दिवसांपूर्वी निखिल बने आणि ‘चला हवा येऊ द्या’ या फेम अभिनेत्री स्नेहल शिदम या दोघांनी एक गोड फोटो पोस्ट केला होता.
-
निखिल बने व स्नेहल शिदमने अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नात हजेरी लावली होती.
-
वनिताच्या लग्नसोहळ्यातील हा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
-
यावेळी ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे आहेत. त्यावेळी स्नेहल ही लाजताना दिसत आहे.
-
त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
-
या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं.
-
या फोटोमुळे स्नेहल व निखिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना पाहायला मिळाले.
-
पण आता मात्र निखिल बनने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
नुकतंच निखिलने ‘Its Majja’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली.
-
त्यावेळी त्याने स्नेहलबरोबर काढलेल्या त्या फोटोबद्दल भाष्य केले.
-
“सध्या मला त्या चर्चांवर काहीही बोलायचं नाही. पण मला सध्या खूप छान वाटतंय.”
-
“कारण आम्ही दोघंही सध्या ट्रेंडमध्ये आहोत.”
-
“आम्ही कॉलेजपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत.”
-
“आम्ही नाटकांपासून एकत्र काम करतोय.”
-
“आम्ही खूप दिवसांनी भेटलो की अनेकदा एकत्र फोटो काढतो.”
-
“त्यादिवशी वनिताच्या लग्नात आम्ही भेटलो. चांगला कॅमेरा होता, म्हणून फोटो काढला.”
-
“माझा कधी नव्हे ते त्या दिवशी आयुष्यात एक बरा फोटो आला आणि तो अपलोड केला तर त्यावरुन इतक्या बातम्या झाल्या.”
-
“याच्या इतक्या बातम्या होतील असं मला वाटलं नव्हतं.”
-
“पण ठिक आहे, मला आवडतंय की लोकांच्या आपण इतके मनात आहोत.”
-
“त्यामुळे तुम्ही हव्या तितक्या बातम्या करा. आम्हाला काहीही हरकत नाही.”
-
“आम्ही एकमेकांचे मित्र आहोत आणि तसेच कायम राहू”, असे निखिल बने म्हणाला.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो.
-
तो सध्या ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत झळकताना दिसत आहे.

१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार