-
मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून नावलौकिक मिळालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही चांगलीच चर्चेत असते.
-
नुकताच सोनालीचा ‘विक्टोरिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला.
-
याबरोबरच सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
तिच्या आयुष्यातील बऱ्याच घटना, ट्रीपचे फोटो असं बरंच काही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते.
-
नुकतंच सोनालीने काळ्या ड्रेसमधले काही फोटोज तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
या आऊटफिटमध्ये सोनाली अत्यंत बोल्ड आणि बिनधास्त अशा अंदाजात आपल्याला पाहायला मिळत आहे.
-
सोनालीचा हा हॉट लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.
-
या फोटोसेशनमध्ये तिने काही फोटो मुद्दाम ब्लर काढले आहेत जे लोकांना प्रचंड आवडले आहेत.
-
सोनालीच्या चाहत्यांना तिचा हा बोल्ड आणि हॉट अवतार चांगलाच पसंत पडला आहे.
-
काही लोकांनी सोनालीची प्रचंड प्रशंसा केली आहे, तरी काहींनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.
-
एका युझरने तिला “काकू जरा दमानं..” असं म्हणत ट्रोल केलं आहे तर एका युझरने तिचे हे फोटोज एखाद्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेतेले वाटत असल्याचं कॉमेंटमध्ये लिहिलं आहे.
-
तिच्या चाहत्यांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे, काहींनी तर तिला पुन्हा बिकिनीमध्ये पाहायची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर तिने हॉलिवूडमध्ये लवकरात लवकर जावं असंही तिच्या चाहत्यांनी कॉमेंट करत सांगितलं आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनेसुद्धा सोनालीच्या या फोटोशूटवर कॉमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. (फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”