-
‘फॅमिली मॅन’सारखी जबरदस्त हीट वेबसीरिज देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांची ‘फर्जी’ ही नवी वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे.
-
या वेबसीरिजचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाहिद आणि विजय सेतुपती यांच्या अभिनयाची प्रशंसा केली जात आहे. तसेच यात आणखीन एक नाव आहे ज्याची चर्चा सध्या होत आहे ते म्हणजे काव्या थापर.
-
२०१८ साली तिने e Maya Peremito या तेलगू चित्रपटातून पदार्पण केलं आहे.
-
काव्याने या वेबसीरिजमध्ये शाहिद कपूरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. अनन्या असं तिच्या पात्राचं नाव आहे.
-
काव्या थापर ही तेलगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेत्री आहे. काव्याने हिंदीतही काही जाहिराती केल्या आहेत.
-
काव्याचा जन्म मुंबईत झाला आणि तिचे शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल, पवईमधून झाले आहे.
-
काव्याने ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बीएमएसमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
-
काव्याला अभिनयाच्याबरोबरीने नृत्य, गाणे, चित्रकला आणि कविता करण्याची आवड आहे.
-
काव्या सोशल मीडियावर सक्रीय असते. बोल्ड लूकमुळे नेटकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं