-
‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरे फिनालेपर्यंत येऊन पोहोचला आहे.
-
शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
शिवच ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकणार असं त्याचे चाहते म्हणत आहेत.
-
या शोदरम्यान शिवने त्याच्या खासगी आयुष्याबाबतही भाष्य केलं.
-
आता पुन्हा एकदा त्याने केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
-
शिव त्याच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला.
-
‘बिग बॉस मराठी’मध्ये त्याची मैत्री अभिनेत्री वीणा जगतापशी झाली. या दोघांच्या नात्याला या घरामध्येच सुरुवात झाली.
-
या दोघांच्या ब्रेकअपच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या. पण अजूनही शिवच्या हातावर वीणाचा टॅटू आहे.
-
अभिनेते अनुपम खेर ‘बिग बॉस’च्या घरामध्ये गेले होते. यावेळी शिवला त्यांनी त्याच्या हातावर असलेल्या वीणाच्या टॅटूबाबत विचारलं.
-
“वीणाला भेटण्यासाठी किती उत्सुक आहेस?” असं अनुपम यांनी शिवला विचारलं.
-
यावेळी तो म्हणाला. “हो मला विणाला भेटायचं आहे”. शिवच्या या उत्तरानंतर पुन्हा एकदा दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. (सर्व फोटो – फेसबुक)
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…