-
‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोचं विजेतेपद कोण पटकावणार? याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा रंगत होत्या.
-
शिव ठाकरे, एमसी स्टॅन हे दोघं या शोचे टॉप २ स्पर्धक होते.
-
अखेरीस रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर शिव या शोचा उपविजेता ठरला.
-
एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये आता आणखीनच वाढ झाली आहे.
-
पण ‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वी एमसी स्टॅन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला.
-
२३ वर्षीय रॅपर पुण्यामधील एका वस्तीमधून आला आणि सोशल मीडियावर तरुणाईचा स्टार बनला. इतकंच नव्हे तर सुरुवातीला तो रिक्षामध्ये झोपायचा. आत त्याच्याकडे लाखो रुपयांची कार आहे.
-
अगदी कमी वयामध्ये एमसी कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. त्याचे युट्यूबवर तीन मिलियन फॉलोवर्स तर इन्स्टाग्राम २ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.
-
‘खुजा मत’ या त्याच्या गाण्यामुळे तो अधिक चर्चेचा विषय ठरला होता. मुस्लिम कुटुंबातील एमसी त्याच्या गर्लफ्रेंडमुळे वादात अडकला.
-
एमसीची एक्स गर्लफ्रेंड औजमा शेख होती. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार त्याने औजमाला मारहाण करण्यासाठी तिच्या घरी काही लोक पाठवले होते.
-
ब्रेकअपनंतर औजमाच्या घराचा पत्ता त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर एमसीचे चाहते औजमाला त्रास देण्यासाठी तिच्या घरापर्यंत पोहोचले होते.
-
त्यानंतर औजमानेही एमसीच्या घराचा पत्ता सोशल मीडियावर पोस्ट केला.
-
दरम्यान एमसीला राग अनावर झाला आणि त्याने औजमाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
-
औजमाला मारहाण करण्यासाठी त्याने त्याच्या मॅनेजरला पाठवलं. यावेळी तिच्या चेहऱ्यावर जखम झाली होती.
-
त्यानंतर औजमाने एमसी विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.
-
त्याशिवाय एमसीच्या गाण्यांचीही सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगताना दिसते.
-
त्याच्या गाण्यामध्ये शिवीगाळ व अपशब्दांचा समावेश असतो.
-
या कारणामुळे बऱ्याचदा एमसीला वादाचा व ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. (सर्व फोटो – फेसबुक)

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…