-
बॉलिवूडमधील लोकप्रिय कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली.
-
सिद्धार्थ-कियाराने जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसवर कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
-
त्यानंतर रविवारी(१२ फेब्रुवारी) सिद्धार्थ-कियाराचा रिसेप्शन सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
रिसेप्शन सोहळ्यासाठी कियाराने लाँग गाऊन परिधान करत खास लूक केला होता. यावर तिने खड्यांच्या ज्वेलरीने फॅशन केली होती.
-
कियारच्या गळ्यातील नेकलेसने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रिसेप्सन सोहळ्यातील कियाराच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.
-
नेटकऱ्यांनी कियाराला रिसेप्शन सोहळ्यातील लूकवरुन ट्रोल केलं आहे. काहींनी कियाराला तिच्या ड्रेसवरुन तर काहींनी ज्वेलरीवरुन ट्रोल केलं आहे.
-
“ड्रेस ठीक आहे. पण ज्वेलरी तर लग्नात घातलेली वाटत आहे”, अशी कमेंट एकाने केली आहे.
-
तर दुसऱ्याने कमेंट करत “अवॉर्ड फंक्शन आहे की वेडिंग रिसेप्शन?”असं म्हटलं आहे.
-
“कुंकू आणि मंगळसूत्र घातलेलं नाही. भारतीय पेहराव करता आला असता”, अशी कमेंटही केली आहे.
-
एका नेटकऱ्याने कियाराच्या ज्वेलरीकडे लक्ष वेधत “कियाराने तिच्या लग्नातलाच ज्वेलरी सेट घातला आहे, असं वाटतंय” अशी कमेंट केली आहे.
-
सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो: इन्स्टाग्राम)
“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस