-
अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलं आहे.
-
दोघांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह केला.
-
स्वराने व्हिडिओ शेअर करत तिच्या व फहादच्या लग्नाबद्दल माहिती दिली.
-
दोघांनी १६ फेब्रुवारी रोजी एंगजेमेंट केली.
-
दोघेही मार्च महिन्यात दिल्लीमध्ये लग्न करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
-
१९९२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेला फहाद स्वरापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे.
-
सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत असलेली स्वरा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. आज आपण स्वरा भास्करच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वरा भास्करची एकूण संपत्ती जवळपास ४० कोटी रुपये आहे.
-
ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये मानधन घेते.
-
चित्रपटांव्यतिरिक्त स्वरा भास्कर सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही मोठी कमाई करते.
-
स्वरा अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिराती करते. यामध्ये तनिष्क ज्वेलरी, फॉर्च्यून रिफाइंड ऑइल आणि स्प्राईट यांचा समावेश आहे.
-
स्वराची दिल्ली आणि मुंबईत घरं आहेत, त्यांची किंमतही कोट्यवधींमध्ये आहे.मुबईत तिचं आलिशान घर आहे.
-
स्वरा भास्करला महागड्या गाड्यांची आवड आहे. स्वराच्या कलेक्शनमध्ये तिची सर्वात आवडती कार BMW X1 असल्याचं म्हटलं जातं. या कारची किंमत सुमारे ४८ लाख रुपये आहे.
-
याशिवाय तिच्याकडे इतरही अनेक आलिशान गाड्या आहेत.
-
(सर्व फोटो – स्वरा भास्करच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून साभार)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक