-
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा युवानेता फहाद अहमदशी ६ जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं.
-
ट्वीटरवरुन लग्नाचा व्हिडीओ शेअर करत स्वराने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
-
त्यानंतर १६ फेब्रुवारीला स्वरा व फहादने गुपचूप साखरपुडाही उरकला.
-
मार्च महिन्यात स्वरा व फहाद लग्न करणार असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे.
-
स्वराचा पती फहाद एक सामाजिक कार्यकर्ता आहे.
-
फहाद सीएएविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. समाजवादी पार्टीचा तो युवा नेता आहे.
-
स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.
-
प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले.
-
त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
विशेष म्हणजे स्वराने फहादला त्याच्या लग्नात येण्याचं वचनही दिलं होतं.
-
२०२० मध्ये फहादने त्याच्या बहिणीच्या लग्नाचं निमंत्रण स्वराला दिलं होतं.
-
परंतु, स्वरा शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिला फहादच्या बहिणीच्या लग्नात उपस्थित राहता आलं नाही.
-
तेव्हा स्वराने फहादला त्याच्या लग्नात नक्की हजर राहण्याचं सांगितलं होतं.
-
लग्नानंतर ट्वीटरवरुन शेअर केलेल्या व्हिडीओत स्वराने पहिल्या भेटीपासून ते लग्न करण्यापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा केला आहे.
-
स्वराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या दोघांना जवळ आणण्यात मांजरीचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं आहे.
-
स्वरा व फहाद दोघेही मांजरप्रेमी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
-
आंदोलनादरम्यान काढलेला पहिला सेल्फी.
-
लग्नातील भावूक करणारा क्षण.
-
स्वरा व फहादच्या खास क्षणांचे फोटोही व्हिडीओत पाहायला मिळत आहेत.
-
स्वराने फहादबरोबर लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
-
स्वरा व फहादला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो: स्वरा भास्कर/ इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा>>
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच