-
रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वाचं विजेतेपद जिंकलं. त्याचं विजेता म्हणून नाव घोषित करण्यात आलं तेव्हाच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
-
शिव ठाकरे किंवा प्रियंका चौधरी यंदाच्या पर्वाचे विजेते ठरतील, अशी चर्चा असतानाच एमसी स्टॅनने ट्रॉफी जिंकली.
-
पुणेकर असलेल्या अवघ्या २३ वर्षीय एमसी स्टॅनचा रॅपर बनण्याचा प्रवास सोपा नव्हता.
-
एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ तडवी आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे.
-
वयाच्या १२ व्या वर्षी स्टॅनने कव्वाली गाण्यास सुरुवात केली.
-
एमसीने अनेक गाणी गायली असली तरी यूट्यूबवर जवळपास २१ मिलियन व्ह्यूज मिळालेल्या ‘वाटा’ या गाण्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली.
-
एमसी केवळ २३ वर्षांचा असून इतक्या कमी वयात तो कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.
-
‘बिग बॉस १६’ च्या प्रीमियरला ६०-७० लाख रुपयांचे हिंदी लिहिलेले नेकपीस आणि ८० हजारांचे शूज घालून आला होता.
-
त्याने गेल्या तीन-चार वर्षांत इतकी लोकप्रियता मिळवली आहे. एमसी स्टेनची एकूण संपत्ती सुमारे ५० लाख आहे. त्याची गाणी आणि यूट्यूब आणि कॉन्सर्टमधून तो दरमहा लाखो रुपये कमावतो.
-
पण याआधी त्याची आर्थिक परिस्थितीही हालाखीची होती.
-
एमसीचा जन्म पुण्यातील अत्यंत मध्यम वर्गीय मुस्लीम कुटुंबात झाला.
-
एक काळ असा होता की एमसीकडे पैसे नव्हते आणि त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागली. पण एमसी स्टॅनने हार न मानता संघर्षातून यश मिळवलं.
-
जेवणासाठीही एमसीकडे पैसे नसायचे. मात्र आत तो लाखो रुपये कमावत आहे.
-
‘मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, एमसी आता एका रिलसाठी १८ ते २३ लाख रुपये मानधन घेतो.
-
तर एका इन्स्टा स्टोरीसाठी तो ५ ते ७ लाख रुपये घेतो. आता ‘बिग बॉस १६’चा विजेता झाल्यानंतर त्याच्या या मानधनामध्ये अधिक वाढ झाली आहे. (सर्व फोटो – फेसबुक)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य