-
अभिनेत्री सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. सारा तिच्या शंकराच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहे. (सर्व फोटो सौजन्य-सारा अली खान-इंस्टाग्राम अकाऊंट)
-
महाशिवरात्रीचं औचित्य साधत सारा अली खानने आज शंकराचं दर्शन घेतलं
-
डोक्यावर ओढणी, कपाळाला चंदन आणि शंकाराच्या पिडींचं दर्शन घेतानाचे फोटो साराने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
साराच्या चेहऱ्यावर शंकराचं दर्शन घेतल्याचं समाधान स्पष्ट दिसतं आहे
-
साराने महाशिवरात्रीचं औचित्य साधत केदारनाथ आणि उज्जैन या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेतलं ते फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आहे
-
तू मुस्लिम आहेस तरी मंदिरात का जातेस? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर तू मुस्लिम असूनही मंदिरात जातेस म्हणून तुला अनफॉलो करतोय असं आणखी एकाने म्हटलं आहे
-
काही युजर्स मात्र साराचं कौतुक करत आहेत. तू मंदिरात जातेस हे फार चांगलं करतेस असंही तिला सांगत आहेत.
-
मात्र शंकराच्या मंदिरात गेल्याचे फोटो पोस्ट केल्याने अनेकांनी साराला ट्रोल केलं आहे
-
सारा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे, ती कायमच या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कनेक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते
-
सारा अली खानच्या घरी गणपतीही बसतो, ती कायमच ते फोटोही पोस्ट करत असते
-
सारा अली खानला यासाठी ट्रोल केलं जातं मात्र तिला याविषयी काही फरक पडत नाही असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे