-
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना बॉलिवूडचे शॉटगन म्हणून ओळखलं जातं.
-
शत्रुघ्न सिन्हा हे चित्रपटात आणि खऱ्या आयुष्यातही डॅशिंग आहेत.
-
सर्वांना ‘खामोश’ करणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांचं नात जगजाहीर आहे.
-
त्या काळात शत्रुघ्न सिन्हा आणि अमिताभ बच्चन यांच्या दोघांमध्ये जराही पटायचं नाही.
-
या दोघांमध्ये पडद्यामागे कायमच संघर्ष पाहायला मिळायचा.
-
पण शत्रुघ्न सिन्हा किंवा अमिताभ बच्चन या दोघांनीही यावर कधीच जाहीरपणे वक्तव्य केलं नाही.
-
मात्र आता एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर थेटपणे भाष्य केले.
-
कोलकातामध्ये आयोजित केलेल्या ‘साहित्य आजतक २०२३’ या कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा यांनी हजेरी लावली.
-
यावेळी त्यांनी चित्रपट, सिनेसृष्टी, बॉयकॉट या विषयांसह विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.
-
या कार्यक्रमात त्यांना अमिताभ बच्चन यांच्याबरोबर असलेल्या नात्याबद्दल विचारणा करण्यात आली.
-
७०-८० च्या दशकात दोन मोठ्या कलाकारांमध्ये आपआपसात अनेकदा संघर्ष असल्याचे बोललं जायचं, हे खरं आहे का? त्यामागचे नेमकं कारण काय? असा प्रश्न शत्रुघ्न सिन्हा यांना विचारण्यात आला.
-
त्यावर ते म्हणाले, “हो, त्यावेळी दोन स्टार्समध्ये संघर्ष असणं ही फार सामान्य गोष्ट होती.”
-
“त्यावेळी तारुण्याचा जोश असतो. प्रत्येकाचे वेगवेगळे चाहते असतात.”
-
“त्यामुळे तुम्ही आपोआप वेगवेगळ्या गटात विभागले जाते.”
-
“चाहते एखाद्याला डोक्यावर घेतात आणि एखाद्याला कमी लेखतात, त्यातूनच हा संघर्ष निर्माण होतो.”
-
“पण आता माझं कुणाशीही शत्रुत्त्व नाही.”
-
यानंतर त्यांना अमिताभ बच्चन यांच्याबरोबर असलेल्या नात्याबद्दल विचारणा करण्यात आली.
-
त्यावर ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यावेळी तरुणपणाचा उत्साह असायचा.”
-
“माझी आणि अमिताभची मैत्री फार जुनी आहे.”
-
“त्याकाळी आमच्या दोघांमध्ये भांडण व्हायचे.”
-
“पण आता ते नाही. त्यावेळी आम्ही प्रसिद्धीझोतात होतो.”
-
“पण काळाबरोबर आमच्या दोघांचं नातं हे चांगलं झालं. आमच्यातील मैत्रीत सुधारणा झाली.”
-
“माझ्या मनात अमिताभ यांच्याविषयी खूप आदर आहे.”
-
“अमिताभ बच्चन हे देशाचे महान अभिनेते आहेत आणि माझे मित्र आहेत, याचा मला आनंद आहे,” असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”