-
अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी एकाच वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
१९६९ मध्ये दोघांनी फिल्मी दुनियेत प्रवेश केला होता. पण अमिताभ यांच्या आधी शत्रुघ्न सिन्हांचं करिअर हिट झालं.
-
त्यांना अनेक चित्रपट आणि मोठ्या भूमिकांच्या ऑफर आल्या. पण अमिताभ यांच्या करिअरमध्ये शत्रुघ्न सिन्हांचा मोठा वाटा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
-
‘जंजीर’ने अमिताभ यांना बॉलिवूडचा अँग्री मॅन बनवले. दीवारने त्यांना अभिनेता बनवलं आणि शोलेने सुपरस्टार बनवलं.
-
या तिन्ही चित्रपटांमध्ये अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेने लोकांच्या मनावर अशी छाप पाडली की त्या भूमिका आजही लोकांना आठवतात.
-
पण तुम्हाला माहित आहे का की याआधी हे दोन्ही चित्रपट शत्रुघ्न सिन्हा यांना ऑफर करण्यात आले होते.
-
या चित्रपटांची स्क्रिप्ट बराच काळ त्याच्याकडे पडून होती, पण शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे त्यावेळी वेळ नव्हता. ते इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते, त्यामुळे त्यांनी सर्व चित्रपट नाकारले होते.
-
नंतर हे चित्रपट अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आले आणि त्यांनी या चित्रपटांमध्ये इतक्या दमदार भूमिका साकारल्या की ते काही वेळातच सुपरस्टार बनले.
-
सर्व फोटो – इंडियन एक्सप्रेसवरून साभार
Mangal Gochar 2025: शनीच्या नक्षत्रामध्ये मंगळच्या प्रवेशाने ५ राशींचे नशीब पलटणार, पैशांचा पाऊस आणि करिअरमध्ये येणार मोठा बदल