-
शिल्पा शेट्टीची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे बरीच चर्चेत येत असते.
-
अभिनयात तिला फारशी चमक दाखवता आली नाही मात्र ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहते.
-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने बोल्ड सीन्सवर भाष्य केलं आहे. त्या एका सीनमुळे तिला त्रास सहन करावा लागला होता.
-
‘मोहब्बतें’ या चित्रपटातून शमिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही तिला मिळाला होता.
-
याच चित्रपटात तिचा अभिनेता उदय चोप्राबरोबर किसिंग सीन होता. त्याबद्दल ती म्हणाली, “मला चांगलं आठवतं आहे की माझ्या किसिंग सीनमुळे माझे वडील माझ्याशी बोलत नव्हते.
-
ती म्हणाली, “महिनाभर ते माझ्याशी बोलले नाहीत. मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ असल्यामुळे ते माझ्याशी न बोलल्याने ते अस्वस्थ होते.”
-
ती पुढे म्हणाली, “पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे चित्रपटांमध्ये ही गोष्ट सामान्य होत गेली. हे बाबांनाही समजले, पण त्यानंतर मी कोणालाच ऑनस्क्रीन किस केले नाही.”
-
झूमला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला आहे. त्या चित्रपटात अनेक नवोदित कलाकार होते.
-
शमिता शेट्टी शेवटची ‘टेनंट’मध्ये दिसली होती तसेच ती ‘बिग बॉस’मध्ये झळकली होती. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर