-
मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
-
प्राजक्ता फक्त इथवरच थांबली नाही तर तिने आता स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे.
-
प्राजक्तराज हा तिचा नवा ज्वेलरी ब्रँड तिने लाँच केला आहे. एकाचवेळी अनेक कामांमध्ये प्राजक्ता व्यग्र आहे.
-
दरम्यान यामधूनच छोटा ब्रेक घेत ती श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात पोहोचली होती.
-
महाशिवरात्रीनिमित्त काही दिवस प्राजक्ता श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली.
-
यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले.
-
आश्रमात बसून तिने जप केला. तिच्यासाठी हा अनुभव आनंदीदायी होता.
-
आता पुन्हा ती तिच्या कामाला लागली आहे.
-
दरम्यान प्राजक्ताने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले.
-
हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने दिलेलं कॅप्शन विशेष लक्षवेधी ठरलं.
-
प्राजक्ता म्हणाली, “नाही नाही संन्यास नाही घेतला. खरं तर जग जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. हिमालयात नाही चालले, आश्रमात फार नाही राहिले. पुन्हा मुंबई मायानगरीमध्ये परतली आहे”.
-
प्राजक्ताच्या या पोस्टनंतर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
-
तू जर संन्यास घेतलास तर आम्ही कसं जगणार, सब मोह माया है, तू लग्न न करण्यातच धन्यता मानत आहेस आणि त्यामुळेच तू आज आनंदी आहेस अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
-
(सर्व फोटो – फेसबुक)

Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम