-
‘बिग बॉस १६’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसली.
-
शिव ठाकरे हा बिग बॉसच्या ट्रॉफीपासून अवघं एक पाऊल दूर राहिला.
-
त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पण शिव ठाकरेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं.
-
त्याच्या खेळापासून त्या मराठी सिनेसृष्टीच नाही तर बॉलिवूडकरांचेही मन जिंकून घेतले.
-
बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून शिव ठाकरे हा सातत्याने चर्चेत आहे.
-
नुकतंच शिवने त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल भाष्य केले आहे.
-
त्यावेळी शिवने त्याचा आणि वीणाचा ब्रेकअप नेमका कधी झाला? हे सांगितले आहे.
-
शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली.
-
शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप गाजली.
-
बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं.
-
शिव-वीणा या दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दलची कबुली दिली होती.
-
त्यावेळी वीणाबरोबरच्या नात्यावरुन शिवला ट्रोल करण्यात आलं होतं. बिग बॉसचा शो जिंकण्यासाठी त्याने पब्लिसिटी स्टंट केला होत, असे काहींचे म्हणणे होते.
-
मात्र त्यानंतर वीणाबरोबर नातं बिग बॉसचा शो जिंकण्यासाठी केलेला पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी खरंच तिच्या प्रेमात आहे, अशी कबुली शिवने दिली होती.
-
वीणानेही तिच्या हातावर ‘शिव’ नावाचा टॅटू काढत प्रेम व्यक्त केलं होतं.
-
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्या दोघांचं नातं छान बहरलं होतं. त्यामुळे त्यांचे चाहतेही आनंदात पाहायला मिळाले.
-
वीणा व शिव हे त्यावेळी सतत एकमेकांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसले.
-
शिव व वीणा या जोडीची तुलना बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलबरोबर केली गेली.
-
शिव व वीणाची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली.
-
बिग बॉस मराठी २ हे पर्व शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरीमुळे चांगलाच गाजले. या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे बिग बॉसला चार चांद लागले होते.
-
त्यानंतर शिवने बिग बॉस १६ च्या घरात वीणाबरोबर नेमका कधी ब्रेकअप झाला? हे सांगितले होते.
-
“आम्ही दोघंही बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही रिलेशनमध्ये होतो.”
-
“आमचे नाते २०१९ मध्ये सुरु झाले. पण २०२२ मध्ये मात्र आमचा ब्रेकअप झाला.”
-
“बिग बॉसच्या घरात येण्याच्या ७ महिन्यांपूर्वी माझा आणि वीणाचा ब्रेकअप झाला होता”, अशी कबुली शिवने दिली होती.
-
दरम्यान बिग बॉसच्या घरात असताना वीणाने शिव ठाकरेला पाठिंबा दिला होता.
-
वीणाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने शिवचा बिग बॉसच्या घरातील रडताना व्हिडीओ पोस्ट केला होता.
-
या पोस्टबरोबर तिने शिवसाठी खास कॅप्शनही दिले होते.
-
“वाघ आहेस तू…. रडू नकोस अजिबात… मी आहे सोबत नेहमी” असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले होते.
-
याबरोबर तिने रेड हार्ट इमोजीही शेअर केले होते.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…