-
‘बिग बॉस हिंदी’च्या घरात आपला माणूस ठरलेला शिव ठाकरे सातत्याने चर्चेत आहे.
-
तो कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो.
-
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून तो विविध मुलाखती देताना दिसत आहे.
-
या मुलाखतीत त्याने बिग बॉस, तिथे आलेले अनुभव, बॉलिवूडमध्ये मिळणारा मान-सन्मान, मैत्री आणि इतर गोष्टींवर भाष्य केले.
-
बिग बॉसमध्ये असल्यापासून शिव ठाकरेला त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले.
-
नुकतंच एका मुलाखतीत शिव ठाकरेने वीणा जगतापबरोबर ब्रेकअप का आणि कसा झाला, याबद्दल सांगितले आहे.
-
“आम्ही दोघंही बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही रिलेशनमध्ये होतो.”
-
“आमचे नाते २०१९ मध्ये सुरु झाले. पण २०२२ मध्ये मात्र आमचा ब्रेकअप झाला.”
-
“बिग बॉसच्या घरात येण्याच्या ७ महिन्यांपूर्वी माझा आणि वीणाचा ब्रेकअप झाला होता”, अशी कबुली शिवने दिली होती.
-
“आमच्या दोघांमध्ये काही गोष्टींमुळे खटके उडाले होते.”
-
“त्यानंतर आम्ही दोघांनी एकत्र बसून परस्पर संमतीने ब्रेकअप केला.”
-
“माझं म्हणणं कायमच असं असायचं की, जेव्हा तुमच्या रिलेशनशिपमधील काही गोष्टी या वर्कआऊट होत नसतील तर तुम्ही त्या गृहीत धरु शकत नाही.”
-
“त्यामुळेच आम्ही परस्पर संमती घेऊन एकमेकांपासून वेगळे झालो.”
-
“आम्ही फार समजुतदारपणे वेगळं होण्याचा निर्णय घेतला.”
-
“त्यावेळी आमच्यात काहीही भांडण झाली नाहीत.”
-
“आम्ही एकमेकांचा आजही आदर करतो. ती चांगलं काम करतेय.”
-
“आम्हाला एकमेकांचं तोंड पाहायचं नाही वैगरे असं काहीही आमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये काहीही झालं नाही.”
-
“आमच्या दोघांमधील नातं फारच गोड होतं.”
-
“तिने माझ्यासाठी खूप गोष्टी केल्या आहेत. मीही तिच्यासाठी तितकंच केलं आहे.”
-
“ती नेहमीच काम करत राहो आणि पुढे जाऊ दे, असे मला कायमच वाटते.”
-
“पण शेवटी काही गोष्टी अशा असतात ज्या शेवटपर्यंत टिकू शकत नाही.”
-
“मग एखाद्याच्या जीवनाशी आपण का खेळायचं? कोणाच्या कुटुंबाशी का खेळायचं? किंवा मग आपण असा निर्णय का घ्यावा, ज्याने भविष्यात आपले नुकसान होईल. शेवटी कुटुंब असतंच.”
-
“मी असा मुलगा आहे की एकदा एखादी गोष्ट झाली तर ती आयुष्यभर बरोबर असायला हवी, असं मला वाटतं”, असे यावेळी शिव ठाकरे म्हणाला.
-
यावेळी शिव ठाकरे अनेकदा कुटुंब असा उल्लेख केला.
-
त्यामुळे त्या दोघांचा ब्रेकअप हा कुटुंबाच्या दबावामुळे झाल्याचे बोललं जात आहे.
-
दरम्यान शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली.
-
शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप गाजली.
-
शिव-वीणा या दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दलची कबुली दिली होती.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख