-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारी रोजी सुमीत लोंढेबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
तिच्या लग्नात हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नातील त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते.
-
याच लग्नातला एक फोटो चला हवा येऊ द्या फेम स्नेहल शिदमने शेअर केला होता. या फोटोत तिच्याबरोबर निखिल बने होता.
-
“पिरतीच्या फडात गं, धरला हात असा, काळीज येंधलं आरल….” असं कॅप्शन स्नेहलने हा फोटो शेअर करताना दिलं होतं.
-
त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या आणि लग्नाच्या खूप चर्चा झाल्या होत्या.
-
पण निखिल बनेने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता स्नेहलनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
“लोकांना फार क्रेझ असते की सेलिब्रिटींच्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते जाणून घेण्याची. आतापर्यंत अनुष्का शर्मा काय करते, काय घालते, कशी राहते याबद्दल लोकांची क्रेझ मी पाहिली होती.”
-
पण, तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तीच क्रेझ आमच्याबद्दल आहे हे बघून भारी वाटलं, असं स्नेहल म्हणाली.
-
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर निखिलला फायदा झाला, असं स्नेहल म्हणाली.
-
निखिल बनेला इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळाली. तसेच दोघांचे फॉलोअर्स वाढले असं स्नेहलने सांगितलं.
-
वनिताच्या लग्नातील तो फोटो व्हायरल झाल्यानंतर स्नेहल व निखिलच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.
-
(सर्व फोटो निखिल व स्नेहलच्या इन्स्टाग्रामवरून साभार)
८ एप्रिल पंचांग: दुःख दूर होणार ते शुभ फळ मिळणार; कामदा एकादशीला भगवान विष्णू कोणत्या राशीला पावणार? वाचा राशिभविष्य