-
‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
प्राजक्ताने नुकतंच प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या’ या शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत प्राजक्ताने दिलखुलासपणे उत्तर दिलं.
-
लग्न करण्याबाबतही प्राजक्ताला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. ‘तू पुढच्या वर्षी लग्न करतेस’, अशी चर्चा रंगली आहे.
-
या प्रश्नावर प्राजक्ता उत्तर देत म्हणाली, “हे दरवर्षी म्हटलं जातं. २०१८ पासून हे सर्व सुरु आहे. यावर्षी नाही नाही पुढच्या वर्षी असं सर्व सुरु आहे. हे सुरुच आहे. पण अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मी लग्न करु नये.”
-
“काहींना वाटतंय मी लग्न करावं, काहींना वाटतंय मी करु नये. त्यांच्यामुळे माझं लग्न रखडतंय. त्या मुलांची अशी इच्छा आहे की मला हिला भेटायचं, त्याशिवाय हिचं लग्न झालं नाही पाहिजे. त्यामुळे माझ लग्न रखडलंय.” असंही प्राजक्ता म्हणाली.
-
प्राजक्ताबरोबर या शोमध्ये तिची मैत्रीण व अभिनेत्री ऋतुजा बागवेनेही हजेरी लावली होती.
-
प्राजक्ताचं उत्तर ऐकून ऋतुजा म्हणाली “तुला कुठे महाराष्ट्रीयन मुलगा हवाय, तुला कोण हवाय ते सांग ना”. त्यानंतर प्राजक्ताने दाक्षिणात्य अभिनेत्यांवर क्रश असल्याचं सांगितलं.
-
प्राजक्ता म्हणाली, “दाक्षिणात्य अभिनेत्यांवर माझं क्रश आहे. आधी प्रभासवर माझं क्रश होतं”
-
“आणि आता नानी नावाचा दाक्षिणात्य सुपरस्टार आहे. तो खूप कमाल आहे, गोड आहे. तो मला आवडतो”, असं प्राजक्ता म्हणाली.
-
पुढे तिने “पण कुणीही असलं तरी शेवटी त्याला मराठीच बनवायचं”, असंही म्हटलं.
-
(सर्व फोटो: प्राजक्ता माळी/ इन्स्टाग्राम)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर