-
बॉलिवूड कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला अप्रूप वाटत असतं. अगदी वाढदिवसापासून ते लग्नापर्यंत सगळ्याच गोष्टी भव्य असतात. (Photo: Alia Bhatt/Instagram)
-
गेल्या काही काळात अनेक अभिनेत्री विवाहबंधनात अडकल्या आणि त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पोषाखाची चर्चा सर्वत्र अजूनही आहे.
-
मनीष मल्होत्रा, सब्यसाची या डिझायनरनी लग्नासाठी खास बनवलेले पोशाख प्रचंड चर्चेत आलेत. (Photo: Katrina Kaif/Instagram)
-
७ फेब्रुवारीला अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगड येथे विवाहबंधनात अडकले. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
यावेळी कियाराने मनीष मल्होत्राने बनवलेला फिकट गुलाबी रंगाचा स्वारोस्की खडे जड्वलेला, रोमन स्थापत्यकलेचा जरीकाम केलेला लेहेंगा परिधान केला होता. त्यावर हिरे आणि पाचूचे दागिने घातले होते. (Photo: Kiara Advani/Instagram)
-
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी सवाई माधोपूर, राजस्थान येथे लग्नगाठ बांधली. (Photo: Katrina Kaif/Instagram)
-
यावेळी कतरिनाने डिझायनर सब्यसाचीने बनवलेला लाल रंगाचा मटका सिल्क आणि त्यावर जरीकाम असलेला पारंपरिक लेहेंगा परिधान केला होता ज्याच्या वेलवेट काठेवार जर्दोसी कलाकुसर केली होती. त्यावर तिने पारंपरिक पंजाबी लाल रंगाची ओढणी घेतली होती. (Photo: Katrina Kaif/Instagram)
-
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी इटलीमध्ये अगदी खास मंडळीत विवाह केला. (Photo: Anushka Sharma/Instagram)
-
यावेळी अनुष्काने मोती, खडे आणि चंदेरी-सोनेरी धाग्यांची कलाकुसर केलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता आणि त्यावर तिने सब्यसाचीच्या हेरिटेज कलेक्शनमधील हिरे-मोत्याचे दागिने घातले होते. (Photo: Anushka Sharma/Instagram)
-
अभिनेत्री सोनम कपूरने लग्नात अहमदाबादमधील एका डिझायनरकडून लाल, सोनेरी रंगसंगती असलेला मध्यप्रदेशमधील हातमागावरील सिल्कपासून बनवलेला लेहेंगा परिधान केला होता. आणि डिझायनरच्या म्हणण्यानुसार हा लेहेंगा बनवायला तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. (Photo: Filmfare/Instagram)
-
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस उमेद भवन पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. त्यावेळी प्रियांकाने सब्यसाचीने डिझाइन केलेला लाल रंगाचा सिल्क, ऑरगांझामध्ये बनलेला आणि त्यावर त्याच रंगात कलाकुसर केलेला लेहेंगा परिधान केला होता. आणि हा लेहेंगा पूर्ण करण्यासाठी ३७२० तास लागले होते. (Priyanka Chopra/Instagram)
-
अभिनेत्री आलिया भटने तिच्या लग्नात पारंपरिक लाल रंग न निवडता क्रीम रंगाची साडी नेसली होती ज्यावर सब्यसाचीच्या हेरिटेज कलेक्शनमधील दागिने परिधान केले होते. (Photo: Alia Bhatt/Instagram)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख