-
बिग बॉस १६ वे पर्व संपल्यापासून मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा चांगलाच चर्चेत आहे.
-
शिव ठाकरे हा बिग बॉसचा विजेता ठरला नसला तरी त्याने सर्व प्रेक्षकांची मनं मात्र जिंकून घेतली.
-
शिव ठाकरेने नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
-
या भेटीमागचे कारण काय, यावेळी नेमकी कशाबद्दल चर्चा झाली, याबद्दल शिव ठाकरेने सविस्तर भाष्य केले.
-
“राज ठाकरेंनी मला अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते.”
-
“ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.”
-
“जेव्हा जेव्हा मराठी माणूस पुढे पाऊल टाकतो तेव्हा राज ठाकरे कायमच शाबासकी देतात आणि त्याची त्यावेळी खरंच खूप गरज असते.”
-
यावेळी शिव ठाकरेला राज ठाकरे, मनसे आणि निवडणूक याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले.
-
“राज ठाकरेंनी स्वत: बोलावून अभिनंदन केले ही गोष्ट मला खूपच आवडली. त्यांनी स्वत: बोलावून माझी पाठ थोपटली”, असे शिवने सांगितले.
-
यावेळी शिवला मनसेकडे तुझा अधिक कल आहे का? असे विचारण्यात आले. त्यावर त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
-
तो म्हणाला, “माझ्यासाठी माणसं महत्त्वाची आहेत. राज सर असू दे किंवा कोणत्याही पक्षाचे काही नेते असू दे, हे लोक मी काही नसताना माझ्याबरोबर होते.”
-
“एखाद्या पक्षापेक्षा ही माणसं खूप महत्त्वाची आहेत.”
-
“त्यामुळे आता मला जे काही मिळालं आहे, त्याकाळात मी त्यांना विसरणार नाही.”
-
“पक्षापेक्षा मी त्या माणसाची माणुसकी पाहतोय.”
-
‘येत्या काळात निवडणुकामध्ये शिव ठाकरे हा मनसेचा प्रचार करताना दिसणार का?’ असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
-
त्यावर तो म्हणाला, “मला या निवडणूक प्रकारापासून दूरच ठेवा.”
-
“मला या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची हे समजत नाही.”
-
“मला इतकंच माहिती आहे की, राज सर एक माणूस म्हणून खूप चांगले आहेत.”
-
“त्यांच्यामध्ये एक कलाकार आहे, ते चित्रकार आहेत अन् चित्रपटांचे कौतुक करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे.”
-
“त्यामुळे ही भेट एका कलाकाराने एका कलाकाराचे कौतुक करण्यासाठी होती.”
-
“तर या भेटीकडे अशाच दृष्टीकोनातून पाहिले जावे”, असे शिव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाला.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल