-
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे.
-
नुकतंच प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उलगडली.
-
यावेळी ‘प्राजक्ताला तुझा मराठी सिनेसृष्टीतील क्रश कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिले.
-
“माझा सिनेसृष्टीतील नानी नावाचा सुपरस्टार क्रश आहे.”
-
“खरतंर क्रश तुम्हाला कधीही भेटाला नाही पाहिजे. नाहीतर मग हा पण तसाच आहे, असं आपलं होतं.”
-
“मराठी सिनेसृष्टीतील क्रशबद्दल बोलायचं तर अभिनेता वैभव तत्त्ववादी हा माझा एकेकाळी क्रश होता.”
-
“मी एकदा आईला हा तुला जावई म्हणून चालेल का, असे देखील विचारले होते.”
-
“कॉफी आणि बरंच काही’ नंतर तो माझा क्रश होता.”
-
“पण आता त्याच्याबरोबर लंडनमध्ये मी एका चित्रपटाच्या शूटींगसाठी गेले होते.”
-
“त्यावेळी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो.”
-
“मी त्याला शूटींगदरम्यान कधीच याबद्दल सांगितले नाही.”
-
“पण एकत्र काम केल्यामुळे आता त्याच्यावर तसा क्रश राहिलेला नाही.”
-
“क्रश हे तुम्हाला भेटले नाही पाहिजेत, तरच ते तुमचे क्रश राहतात.”
-
“यामुळेच मराठी सिनेसृष्टीतील कोणी कोणाचे क्रश राहत नाही”, असे प्राजक्ता माळीने सांगितले.
-
दरम्यान प्राजक्ता माळी आणि अभिनेता वैभव तत्त्ववादी यांचा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे आणि हृषिकेश जोशी अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
-
या चित्रपटाचे शूटींग लंडनला पार पडले आहे.
-
मात्र अद्याप हा चित्रपट कोणता? याचे नाव काय? तो कधी प्रदर्शित होणार? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य