-
मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते.
-
सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
-
त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
-
मिताली मयेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते.
-
नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
-
तिने तिचा अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे.
-
याला तिने ‘अपवित्र’ असे कॅप्शन दिले आहे.
-
तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत.
-
“बाथरूम बांधता बांधता गवंडी पळून गेला… ते तसंच राहिलंय…”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने या फोटोवर केली आहे. तर एकाने “बेचारा सिद्धार्थ कस सहन करत असेल मितालीला”, अशी कमेंट केली आहे.
-
“लग्न झालंय तरीही ही फालतूगिरी”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “अंघोळ करायला एवढ्या दूर कोणी जातं का राव”, अशी कमेंट केली आहे.
-
“खट्टा मीठा मधला जॉनी लिव्हर रोडलोलर घेऊन यांचं बाथरूम पाडून फोटो काढून गेला वाटत”, अशी कमेंट केली आहे. तर एकाने “मराठी कलाकारांकडून या गोष्टी अपेक्षित नाहीत”, अशी कमेंट केली आहे.
-
तिच्या या फोटोवर सिद्धार्थनेही मराठीत कमेंट केली आहे.
-
“काय पण हे फोटोस टाकणं. मी एवढ्या लांब असताना”, असे त्याने या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे.
-
त्यावर मितालीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
-
सिद्धार्थने केलेल्या या कमेंटवर मितालीने “इशारा समज आणि परत ये” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती