-
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटात फारशा महत्त्वाच्या भूमिका करत नसली तरी उर्वशी तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असते.
-
आता वेगळाच कारणाने उर्वशीकडे सर्वांचं लक्ष वेधले गेले आहे. हे कारण म्हणजे तिने स्वतःच्या वाढदिवसाला केलेला खर्च.
-
२५ फेब्रुवारीला उर्वशी रौतेलाचा वाढदिवस असतो. दरवर्षी ती तिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करते. यावर्षी देखील तिने तिचा वाढदिवस दिमाखात साजरा केला.
-
पॅरिसला जाऊन आयफेल टॉवरवर तिने तिचं बर्थडे सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनसाठी तिने खर्च केलेली रक्कम आता समोर आली आहे.
-
ही रक्कम इतकी मोठी आहे की त्या पैशात १ घरही येईल.
-
उर्वशी नुकतेच तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले.
-
हा तिचा वाढदिवस साजरा करताना तिने लाखो रुपये खर्च केले.
-
उर्वशीकडे २४ कॅरेट सोन्याचे कपकेक आणि १०० डायमंड जडलेल्या गुलाबांचा डायमंड केक होता आणि संपूर्ण सजावट ही हेलियम फुगे, गुलाबी आणि लाल गुलाब आणि मेणबत्त्यांनी सजलेली होती.
-
या वाढदिवसासाठी तिने एकूण ९३ लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता उर्वशीचा हे बर्थडे सेलिब्रेशन आणि या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ खूपच चर्चेत आले आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”