-
अन्नू कपूर हे एकेकाळचा हिट शो ‘अंताक्षरी’च्या वृत्तनिवेदनामुळे ओळखले जातात. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये कामही केलं आहे.
-
पण, अन्नू कपूर यांचे खरं नाव अनिल कपूर आहे आणि त्यांचे नाव बदलण्यामागील कथा देखील अभिनेते अनिल कपूर यांच्याशी संबंधित आहे.
-
८० च्या दशकात करिअरची सुरुवात करणाऱ्या अन्नू कपूर यांनी ‘मशाल’ चित्रपटात अनिल कपूरबरोबर काम केलं होतं.
-
दोघांचंही नाव सारखं होतं, त्यामुळे पेमेंट देताना घोळ झाला. सारखं नाव असल्याने अन्नू कपूर यांना अनिल कपूर यांचे १० हजार दिले गेले, तर अनिल कपूर यांना फक्त ४ हजार रुपये मिळाले.
-
अनिल कपूर यांनी भाऊ बोनी कपूर यांना पेमेंटची तक्रार केली. त्यानंतर पडताळणी केली असता दोघांच्या नावातील साधर्म्यामुळे हा गोंधळ झाल्याचं समजलं.
-
त्यानंतर शबाना आजमीसह अनेकांनी त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी स्वतःचं नाव बदलून अन्नू कपूर ठेवलं.
-
अन्नू कपूर त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिले. त्यांच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. त्यांची पत्नी अनुपमा अमेरिकन आहे. त्यांनी १९९२ मध्ये लग्न केलं होतं, पण वर्षभरातच त्यांच्यात वाद होऊ लागले,
-
अशातच अन्नूंच्या आयुष्यात अरुणिताची एंट्री झाली. अन्नू यांनी अनुपमाला घटस्फोट देत अरुणिताशी लग्न केलं आणि मुलगीही झाली.
-
पण नंतर मात्र त्यांना पहिल्या पत्नीवर प्रेम जडलं, ते तिला लपून भेटू लागले. अरुणिताला त्यांच्यावर संशय आला आणि एकेदिवशी तिला सत्य समजलं.
-
सत्य समजल्यानंतर अरुणिताने अन्नू कपूरपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २००५ मध्ये अन्नूचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाला.
-
अरुणितापासून विभक्त झाल्यानंतर अन्नू यांनी २००८ मध्ये पहिली पत्नी अनुपमाशी पुन्हा लग्न केलं.
-
(सर्व फोटो इंडियन एक्सप्रेस)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?