-
‘बिग बॉस १६’ च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसली.
-
शिव ठाकरे हा बिग बॉसच्या ट्रॉफीपासून अवघं एक पाऊल दूर राहिला.
-
त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
-
पण शिव ठाकरेने प्रेक्षकांच्या मनामध्ये मात्र घर केलं.
-
बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारही शिव ठाकरेचे कौतुक करताना पाहायला मिळाले.
-
बिग बॉसमुळे शिव ठाकरे घराघरात पोहोचला.
-
त्यामुळे फक्त मराठी सिनेसृष्टीत नव्हे तर घराघरात शिव ठाकरे हे नाव आता लोकप्रिय झाले आहे.
-
शिव ठाकरेने ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि ‘बिग बॉस हिंदी’ असे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत.
-
बिग बॉस १६ च्या घरातून बाहेर आल्यानंतर शिव ठाकरे हा विविध मुलाखत देताना दिसत आहे.
-
नुकतंच एका मुलाखतीत शिव ठाकरेने त्याच्या वयाबद्दल खुलासा केला आहे.
-
‘शिव ठाकरेचे नेमकं वय किती आहे?’ असा प्रश्न त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता.
-
त्यावर त्याने फारच गंमतीशीर उत्तर दिले.
-
“जे वय स्वप्नासाठी बरोबर असतं.”
-
“तसेच मेहनत करण्यासाठी अगदी बरोबर असतं, तेच माझं वय आहे”, असे शिव ठाकरे म्हणाला.
-
दरम्यान शिव ठाकरेचा जन्म ९ सप्टेंबर १९८९ मध्ये अमरावतीत झाला. सध्या तो ३३ वर्षांचा आहे.

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही