-
अभिनेत्री सुश्मिता सेनने वयाची ४५शी ओलांडली आहे.
-
पण आजही ती बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींना सौंदर्य व फिटनेसच्या बाबतीत टक्कर देते.
-
योगा व नियमित व्यायाम सुश्मिता करते.
-
आपल्या आरोग्याकडे कधीच दुर्लक्ष न करणाऱ्या अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एक धक्कादायक खुलासा केला आहे.
-
तिने आपल्या आरोग्याबाबत माहिती दिली आहे.
-
काही दिवसांपूर्वी सुश्मिताला हृदयविकाराचा झटका येऊन गेला.
-
इतकंच नव्हे तर तिला होणारा त्रास पाहता सुश्मिताची अँजिओप्लास्टीही करण्यात आली.
-
वडिलांबरोबरचा हसरा फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली.
-
सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला हे ऐकूनच चाहते चिंतेत पडले आहेत.
-
सुश्मिता म्हणाली, “काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टीही झाली.”
-
“आता ठिक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञांनी माझं हृदय मोठं आहे याची मला खात्री पटवून दिली.”
-
“यादरम्यान बऱ्याच लोकांनी मला मदत केली. या लोकांसाठी मी दुसरी पोस्ट शेअर करेन”.
-
“ही पोस्ट फक्त माझ्या शुभचिंतक व जवळच्या व्यक्तींसाठी आहे. आता मी अगदी मस्त आहे ही आनंदाची बातमी मला तुम्हाला द्यायची होती.”
-
“मी नवीन आयुष्यासाठी आता तयार आहे”.
-
सुश्मिताच्या या पोस्टनंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. चाहते तू लवकर यामधून बरी हो, तुझी काळजी घे असं कमेंट करत म्हणत आहेत. (सर्व फोटो – फेसबुक)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”