-
‘बिग बॉस हिंदी’मुळे मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे सातत्याने चर्चेत आहे.
-
तो कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो.
-
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून तो विविध मुलाखती देताना दिसत आहे.
-
या मुलाखतीत त्याने बिग बॉस, तिथे आलेले अनुभव, बॉलिवूडमध्ये मिळणारा मान-सन्मान, मैत्री आणि इतर गोष्टींवर भाष्य केले.
-
बिग बॉसमध्ये असल्यापासून शिव ठाकरेला त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले.
-
एका मुलाखतीत शिव ठाकरेने वीणा जगतापबरोबर ब्रेकअप का आणि कसा झाला, याबद्दल सांगितले आहे.
-
“आम्ही दोघंही बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही रिलेशनमध्ये होतो.”
-
“आमचे नाते २०१९ मध्ये सुरु झाले. पण २०२२ मध्ये मात्र आमचा ब्रेकअप झाला.”
-
“बिग बॉसच्या घरात येण्याच्या ७ महिन्यांपूर्वी माझा आणि वीणाचा ब्रेकअप झाला होता”, अशी कबुली शिवने दिली होती.
-
शिवची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापने यापूर्वी अनेकदा शिवबद्दल स्पष्टपणे मत व्यक्त केले होते.
-
वीणाने काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन घेतलं.
-
यावेळी तिला एका युझरने शिवबद्दल प्रश्न विचारला.
-
शिव दादा आणि तुझ्यात काय सुरु आहे? असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला.
-
त्यावर उत्तर देताना ती चांगलीच भडकली.
-
तिने त्या चाहत्याला सडेतोड उत्तर दिले.
-
“पहिले आणि शेवटचं…. मी कोणत्याही व्यक्तीला माझ्या खासगी आयुष्याबद्दल माहिती देण्यासाठी बांधील नाही.”
-
“थोडीतरी नैतिकता बाळगा आणि इतरांना मोकळा श्वास घेऊ द्या.”
-
“मी कधी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल विचारते का? की तुमचे काय सुरु आहे आणि काय नाही?”
-
“कारण मी नेहमी माझ्याबद्ल आणि माझ्यापुरती मर्यादित असते”, असे वीणा यावेळी म्हणाली होती.
-
वीणाने दिलेल्या या उत्तरामुळे तिचे आणि शिवचे बिनसलं असल्याचे उघड झालं होतं.
-
काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेनेही त्यांचा ब्रेकअप झाल्याची कबुली दिली होती.
-
पण त्यांचे अनेक चाहते हे शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांनी एकत्र यावे, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
-
त्या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवर सातत्याने याबद्दलच्या कमेंट पाहायला मिळत आहे.
-
मात्र शिव ठाकरे आणि वीणा याबद्दल बोलणं टाळताना दिसत आहेत.

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…